दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी प्रवाशाची तब्बेत बिघडल्याने पायलटने कराची विमानातळावर इमर्जन्सी लॅंडिंगची परवानगी मागितली. मात्र, विमान कराची विमानतळावर उतरण्यापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला. अब्दुल्ला असं या प्रवाशांचे नाव असून तो नायझेरियन नागरीक असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा राडा! सिगारेट प्यायला, सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि…
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री इंडिगो एअरलाइन्सच्या ६ई-१७३६ या विमानाने दिल्लीहून दोहाला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. मात्र, काही वेळातच विमानात बसलेल्या नायझेरियन नागरिकाची अचानक तब्बेत बिघडली. पायलटने तत्काळ कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत इमर्जन्सी लॅंडिंगची परवानगी मागितली. कराची विमानतळ प्रशासनानेही लॅंडिंगची परवानगी दिली. तसेच विमानतळावर विमानतळावर वैद्यकीय पथकाही दाखल झाले. मात्र, विमान उतरण्यापूर्वी प्रवाशाचा मृत्यू झाला होता. विमान कराचीत उतरताच वैद्यकीय पथकाने प्रवाशाची तपासणी केली. तसेच मृत्यूची पुष्टी केली.
दरम्यान, एअर इंडिगोने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. एअर इंडिगोतील प्रवाशाच्या मृत्यूच्या घटनेने आम्हाला दुःख झाले असून आम्ही त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.