Nikhil Kamath : अलीकडच्या काळात विविध शहरात घरभाडे झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळते. तसेच घर विकत घ्यायला गेलं तर घरांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे . एका अहवालानुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये गेल्या वर्षात सरासरी घरभाडे दुप्पट झाले आहे. देशातील आयटी हब असलेल्या काही शहरात लोकांना भाड्याने राहण्यासाठी घरेही मिळत नाहीत, तर शहरात घरभाडे झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकांना घर भाड्यानं घ्यावं की विकत? असा प्रश्न पडतो.
दरम्यान, डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे सह संस्थापक निखिल कामत हे लोकांना घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतल्यास अधिक फायदेशीर ठरत असल्याचा सल्ला देत असत. तसेच ते नेहमीच घर विकत घेण्याच्या कल्पनेबाबत असहमती दर्शवत असत. त्यांच्या या मतावर अनेकदा घर भाड्यानं घ्यावं की विकत? असा वादही रंगला. मात्र, आता लोकांना घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचा सल्ला देणारे निखिल कामत यांनीच घर विकत घेतले आहे. त्यामुळे घर भाड्यानं घ्यावं की विकत? असा वाद पुन्हा एकदा रंगला आहे.
हेही वाचा : Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, निखिल कामत यांनी स्वत: घर खरेदी का केलं? यावर कामत यांनी ‘डब्ल्यूटीएफ इज विथ निखिल कामत’ या पॉडकास्टच्या माध्यमातून स्पष्टीकरणही दिलं. मात्र, घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घर घेण्याचा सल्ला देणारे निखिल कामत यांनीच घर खरेदी केल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेकांनी त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे, तर अनेकांनी त्यांच्या घर घेण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे घर भाड्याने घ्यावे की विकत? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, निखिल कामत हे अब्जाधीशांपैकी एक आहेत. ते रिअल इस्टेटमध्ये आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांनी आता त्यांच्या मतावरून यू-टर्न घेतला आहे. यावेळी बोलताना निखिल कामत यांनी घर भाड्याने घेण्याचा एक तोटाही सांगितला आहे. ते म्हणाले की, “घर भाड्याने घेण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, एक तोटा देखील आहे. कारण भाड्याच्या घरातून कधी बाहेर पडावं लागेल हे आपल्या माहिती नसतं किंवा ते आपल्या हातात नसतं. मग मला ज्या घरामधून अचानक बाहेर पडायला लागलं असतं तर मला त्या ठिकाणी आणखी काही दिवस राहायला आवडलं नसतं”, असं कामत यांनी म्हटलं.