Nikhil Kamath And Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्टमध्ये नुकतेच झळकले आहेत. यामध्ये निखल कामथ आणि बिल गेट्स यांनी विवध गोष्टींवर चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी, जर लोकांना कठोर परिश्रम करायचे असतील आणि स्वतःला फसवू नये असे वाटत असेल तर त्यांनी स्वतः “खूप कठोर” असले पाहिजे असे म्हटले आहे.
या पॉडकास्टमध्ये, निखिल कामथ यांनी बिल गेट्स यांना सांगितले की, ते भारतात असतानाही नेहमीच घाईत का असतात असे विचारले. त्याचबरोबर कामथ यांनी गेट्स यांना विचारले की, ते राजणकारणी आणि इतरांना भेटण्यासाठी इतके का धावत राहतात.
यावर, बिल गेट्स म्हणाले, “हे खूप मजेदार आहे असे वाटते का? नाही, मला वाटते की जर तुम्हाला कठोर परिश्रम करायचे असतील आणि स्वतःला फसवू नये असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतः कठोर असले पाहिजे.”
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक यांनी भारताला अनेक भेटी दिल्या आहेत. या भेटींदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, हरदीप सिंग पुरी आणि जितेंद्र सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या वर्षीच मार्चमध्ये भारत दौरा केला होता.
पॉडकास्टमध्ये, निखिल कामथ यांनी “अत्यंत भांडवलशाही दृष्टिकोनातून” प्रचंड लोकसंख्या वरदान आहे की शाप आहे, यावर बिल गेट्स यांचे मत विचारले.
याला उत्तर देताना बिल गेट्स म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सुमारे दोन दशकांनंतर बरेच काही बदल झालेले पाहायला मिळेल आणि त्यामुळे “खूप वेळ वाचलणार आहे.”
“तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लवकर निवृत्त होऊ शकता, तुम्ही कामाचे आठवडे कमी करू शकता. त्यासाठी जवळजवळ तात्विक पुनर्विचार करावा लागेल, ठीक आहे, पण वेळ कसा घालवाणार?”, असेही गेट्स पुढे म्हणाले.
जर लोकांना काम करावे लागले नाही तर ते काय करतील असे विचारले असता, बिल गेट्स म्हणाले, “मला काम करावे लागत नाही. मी काम करणे निवडतो.”
दरम्यान झिरोधाचे सह-सस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर निक्सन यांच्यासारखे प्रसिद्ध लोक झळकले आहेत.