प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वत:ची ओळख प्राप्त व्हावी यासाठी सरकारकडून राबविण्यात येणा-या आधार(आयडेंटिफिकेशन ऑथोरीटी ऑफ इंडिया) या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या अध्यक्ष नंदन निलकेणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये नंदन निलकेणी बंगळुरूमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तीन दिवसांतच नंदन निलकेणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. निलकेणी यांनी सन २००७मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या आधार प्रकल्पाची सुत्रे हाती घेतली होती. नंदन निलकेणी यांच्यामुळे सरकारला हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात यश मिळाले होते. आगामी निवडणुकांमध्ये बंगळुरू मतदारसंघातील भाजपचे खासदार अनंत कुमार यांच्याविरोधात निलकेणी निवडणूक लढविणार आहेत.  

Story img Loader