उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपाने शनिवारी घोषणा केली होती. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरुन राणे बंधुंनी ट्वीटवरुन शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका केलीय.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन विरोधी पक्षांच्या बैठकीचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोंपैकी एका फोटोत सर्व नेते पवारांच्या घरामधील हॉलमध्ये बसल्याचं दिसत असून त्यामध्ये संजय राऊत यांचाही समावेश आहे. आज बिगरभाजपा पक्षांबरोबरच इतर गटांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला, अशा कॅप्शनसहीत पवारांनी हा फोटो ट्वीट केलाय.

नक्की वाचा >> ‘गरज पडली तर…’ ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

मात्र त्यानंतर हाच फोटो ट्वीट करत भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन संजय राऊत या बैठकीला उपस्थित कसे असा प्रश्न विचारला आहे. नितेस यांनी वादग्रस्त भाषेत एक ट्वीट केलं आहे. “त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मग संजय राऊत विरोधकांच्या बैठकीला काय करत आहेत?” असा प्रश्न निलेश राणेंनी ट्वीटरवरुन पवारांनी शेअर केलेला फोटो पोस्ट करत विचारलाय. तसेच पुढे बोलताना निलेश राणेंनी, “आपल्या मालकाचा इमानदार पाळीव प्राणी! अजूनही वेळ गेलेली नाही उद्धवजी,” असं म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

सामना गमावल्यानंतर पराभूत संघाची ड्रेसिंग रुम अशी कॅप्शन देत विरोधी पक्षांच्या बैठकीतील हा फोटो निलेश राणेंचे बंधू आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शेअर केलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलाय. याच मुद्द्याच्या आधारे ही टीका राणे बंधुंनी केलीय. आज म्हणजेच १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh nitesh rane slams sanjay raut for attending opposition meeting as uddhav announce support to draupadi murmu scsg