Nimisha Priya death row: येमेनचे अध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी (Rashad Muhammed al-Alimi) यांनी पतीची हत्या करणाऱ्या केरळमधील एका नर्सला देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजूरी दिली आहे. त्यानंतर भारत सरकार निमिषा प्रिया या नर्सला शक्य अशी सर्व मदत करणार असल्याचे मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “येमेनमध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्हाला समजले की प्रियाचे कुटुंब सध्या मार्ग शोधत आहे. सरकार या प्रकरणात शक्य ती सर्व मदत करत आहे”.
केरळ येथील निमिशा प्रिया हिला २०१७ मध्ये तलाल अब्दो महदी याच्या हत्येप्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रियाला तो शिवीगाळ आणि छळ करत असे. निमिषा प्रियाने त्याच्या ताब्यातील आपला पासपोर्ट परत घेण्यासाठी त्याला गुंगीचे औषध दिले होते.
नेमकं काय झालं होतं?
फिर्यादीने या प्रकरणात निमिषा प्रियाने महदी याची हत्या केल्याचे सिद्ध केले आहे. महदी आणि निमिषा या दोघांनी येमेनची राजधानी सना येथे एक दवाखाना सुरू केला होता. मात्र नंतर तिने आपल्या त्याच्या शरीराचे तुकडे करून ते एका टाकीत फेकून दिले. महदी याने तिच्यावर केलेल्या छळाचा बदला घेण्यासाठी निमिषा प्रियाने ही हत्या केल्याचे सांगितले जाते. त्याने आपाला पासपोर्ट काढून घेतला होता असेही निमिषाने न्यायालयात सांगितले.
दरम्यान येमेनचे अध्यक्ष अल-अलिमी यांनी मंजूरी दिल्यानंतर आता एका महिन्याच्या आत मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते. यादरम्यान सेव्ह निमिशा प्रिया अॅक्शन कौन्सिल आणि तिच्या कुटुंबियांकडून पीडित व्यक्तीचे कुटुंबिय आणि त्याच्या ट्राइहच्या नेत्यांशी वाटाघाटी केल्या जाणार आहेत. तसेच या प्रकरणात पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला किती रक्कम दिली गेली पाहिजे यासंबंधी वाटाघाटी करण्यासाठी निमिषाची आई ही सध्या सना येथे पोहचली आहे.
भारतीय दूतावासाने नेमलेले वकील अब्दुल्ला अमीर यांनी प्रकरणातील पुढील चर्चेसाठी २० हजार डॉलर (अंदाजे १६.७ लाख रुपये) प्री-निगोशियशन फी माहितल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या वाटाघाटी रखडल्या होत्या. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जुलैमध्ये १९,८७१ डॉलर दिलेले असताना अमीरने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये द्यायचे असलेल्या ४० हजार डॉलर्सची मागणी केली होती.
दरम्यान सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिलने पहिला हप्ता क्राउडफंडिंच्या मदतीने यशस्वीरित्या जमा केला होता. पण नंतर या निधीचा वापर कसा केला जात आहे? याबद्दल देणगीदारांना स्पष्टीकरण देताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता.