आसाममधील नागाव येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊजण ठार झाले असून, २४ जण जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची ही बस गुवाहाटीहून लाखीनपूर येथे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरबिंद कलिता यांनी दिली. बस चालकाहसह आठजणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader