राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) एका मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून रेल्वे पोलिसांनी सौराष्ट्र सीमासुरक्षा दलाच्या नऊ जवानांना शुक्रवारी रात्री येथे अटक केली.
नवी दिल्ली गुवाहाटी संपर्कक्रांती एक्स्प्रेसने संबंधित मुलगी निघाली होती. गाडी उत्तरप्रदेशमधून जाताना या जवानांनी तिची आणि अन्य महिला प्रवाशांची छेडछाड केल्याचा आरोप तिने केला.
ईशान्येकडील राष्ट्रीय छात्र सेनेचा मुलींचा गट या गाडीतून निघाला होता. त्यावेळी ही घटना घडली. संबंधित मुलीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर त्यांनी तातडीने कारवाई करीत मुघलसराई रेल्वे स्थानकावर या जवानांना अटक केली.
अटक करण्यात आलेले सर्वजण आमची टर उडवत होते. आम्ही जागा बदलल्यावरदेखील त्यांनी अश्लिल टिप्पणी करणे बंद केले नाही, असे संबंधित मुलीने पत्रकारांना सांगितले.

Story img Loader