दिल्लीतील बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला. २० मार्च २०२० ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धा तास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली आणि लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला. पण, अखेर सात वर्षांनंतर या चौघांना फासावर लटकवण्यात आले.

CoronaVirus : कसोटीचा काळ आहे… जबाबदारीने वागा!!

निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी झाल्यावर सर्व स्तरातून निर्भयाला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाल्याच्या भावना उमटल्या. या मुद्द्यावर बोलताना भाजपा खासदार गौतम गंभीर याने निकालाची अंमलबजावणी होण्यास उशीर झाल्याची कबुली दिली. अखेर दोषींना मरेपर्यंत फाशी देण्यात आली. निर्भया, तुला न्याय मिळायला उशीर झाला हे मान्य करतो, असे ट्विट गंभीरने केले.

IPL 2020 रद्द झाल्यास कोणाला बसणार किती कोटींचा फटका?

दरम्यान, तिहार तुरुंगात एकाच वेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. यातील एक खटका (लीवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, तर दुसरा जेलच्या स्टाफने. त्यापूर्वी पहाटे ३.१५ वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं.

आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेवून जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळून राहिला… त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्यावेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींच्या गळ्याभोवतीचा फास आवळला.

Story img Loader