अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना ओबामा यांनी हे वक्तव्य करण्यात आलं. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी तिखट प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओबामा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी (बराक ओबामा) भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्य करणं, हे आश्चर्यकारक आहे.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, “मी अत्यंत जबाबदारपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण कदाचित त्यांच्यामुळेच (ओबामा) सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले होते. तरीही ते भारतातील धार्मिक सहिष्णुतेवर टिप्पण्या करत आहेत. ओबामांच्या कार्यकालात सीरिया ते येमेन आणि सौदी अरेबिया ते इराक अशा देशांवर बॉम्बस्फोट झाले नाहीत का? तेव्हा सात देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या देशांत सुमारे २६ हजार बॉम्ब टाकले होते. असे नेते (बराक ओबामा) जेव्हा भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, तेव्हा त्यांना कोण गांभीर्यानं घेणार?”

हेही वाचा- “भारतातील मुस्लिम समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा…”, बराक ओबामांनी बायडेन यांना दिलेल्या सल्ल्याने वेधलं लक्ष

हेही वाचा- “…तेव्हा पहिल्यांदा ‘व्हाईट हाऊस’ बाहेरून बघितलं होतं” पंतप्रधान मोदींनी सांगितली ३० वर्षांपूर्वीची आठवण

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर लगेचच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची एक मुलाखत ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीने प्रसारित केली. ज्यामध्ये ओबामा म्हणाले की, त्यांना जर मोदींशी चर्चा करण्याची संधी मिळाली तर ते भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांच्या हक्कांवर चर्चा करतील. मुस्लिमांचे मानवी अधिकार संरक्षित करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलत आहात, असं मी मोदींना विचारेन, असं ओबामांनी म्हटलं होतं.

हेही वाचा- अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’चा नारा, “मोदी खूनी आहेत” म्हणत नागरिकांकडून निषेध

“माझं जर मोदींशी संभाषण झालं, तर माझ्या युक्तिवादाचा एक भाग असा असेल की, जर तुम्ही (मोदींनी) भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण केलं नाही, तर येत्या काळात भारताचे तुकडे व्हायला सुरुवात होईल, अशी दाट शक्यता आहे. देशाच्या अंतर्गत जेव्हा असे मोठे संघर्ष निर्माण होतात, तेव्हा काय होतं, ते आम्ही पाहिलं आहे. हे नक्कीच भारताच्या हिताचं नसेल,” असे बराक ओबामा यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmala sitharaman on barack obama statement about muslim minority in india during pm modi visit america rmm
Show comments