Nissan कंपनीने आपली लोकप्रिय कार Sunny ची विशेष आवृत्ती बाजारात आणली आहे. ‘सन्नी स्पेशल एडिशन’ असं या आवृत्तीला नाव देण्यात आलं आहे. मर्यादीत संख्येत या मॉडेलची विक्री होईल. या विशेष आवृत्तीची किंमत 8.48 लाख(एक्स-शोरुम) रुपये ठेवण्यात आली आहे. मारुतीच्या Ciaz आणि Honda City ला या आवृत्तीमुळे टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये हे मॉडेल उपलब्ध असणार आहे. यामध्ये 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. तर 1.5 लिटर K9K डिझेल इंजिनचा पर्याय देखील ग्राहकांपुढे आहे. हे इंजिनदेखील 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सयुक्त असेल.

‘सन्नी स्पेशल एडिशन’ च्या आतील आणि बाहेरील बाजूला अपडेट करण्यात आलं आहे. कारच्या बाहेरील बाजूचा विचार केल्यास यामध्ये व्हाइट कलरचा शेड मिळेल. यामध्ये ब्लॅक रुफ, व्हिल कव्हर्स आणि रिअर स्पॉइलर देखील असणार आहे. तर, कारच्या आतील बाजूमध्ये 6.2 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम असेल. यामध्ये ब्लॅक आणि रेड कलरमध्ये सीट असतील आणि त्या रंगांना शोभणारे मॅट्स देखील देण्यात आले आहेत. याशिवाय, ड्यूअल एअरबॅग्स, की-लेस एंट्री आणि ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर हे नवे फिचरही आहेत.