Nita Ambani Rapid Fire Round at Harvard University : रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी हार्वर्ड कॉन्फरन्स २०२५ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. य परिषदेत त्यांनी संवादही साधला. तसंच, रॅपिड फायरमध्येही सहभाग घेतला. या रॅपिड फायरमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं त्यांनी सूचकतेने दिलेल्या उत्तरामुळे त्यांचं कौतुक होतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स समूहाचे प्रमुख आणि जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना रॅपिड फायरदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पती मुकेश अंबानी यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितलं. या प्रश्नावर त्यांनी अजिबात वेळ न दवडता म्हणाल्या, मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी चांगले आहेत आणि माझे पती मुकेश माझ्या कुटुंबासाठी चांगले आहेत.” नीता अंबानी यांच्या या उत्तराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

हा रॅपिड फायरचा राऊंड इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून यावरही अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय.

हार्वर्ड येथे नीता अंबानींची उपस्थिती

हार्वर्ड येथील इंडिया कॉन्फरन्समध्ये नीता अंबानी यांनी भरतकाम केलेली नेव्ही ब्लू साडी परिधान केली होती . मॅसॅच्युसेट्समधील केंब्रिज येथे स्थित हार्वर्ड विद्यापीठ ही आयव्ही लीगची एक संस्था आहे जी उच्च शिक्षणासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानली जाते. हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी पार पडला. हा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे आणि भारतीय व्यवसाय, धोरण आणि संस्कृती यावर चर्चा आणि विश्लेषण करण्याचे आणि एक आघाडीचा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणून देशाच्या उदयावर प्रकाश टाकण्याचे ठिकाण आहे.

अंबानी यांच्या परिषदेतील सहभागाबाबतच्या आधीच्या घोषणेत त्यांचे वर्णन “ग्रामीण परिवर्तन, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, कला आणि शहरी नूतनीकरण यासारख्या उपक्रमांद्वारे सुमारे ८ कोटी जीवनांवर प्रभाव पाडणारी” अशी करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात अंबानी यांना मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी प्रतिष्ठित गव्हर्नर प्रशस्तिपत्र प्रदान केले. या प्रशस्तिपत्रात शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा, कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणातील त्यांच्या भूमिकेची दखल घेण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani choose between pm modi and mukesh ambani during rapid fire round at harvard university sgk