दिल्लीत कोणत्याही स्थितीत भाजपचे सरकार येऊ नये यासाठी एका बडय़ा उद्योगपतीच्या मध्यस्थीत हॉटेलात ‘आप’ आणि काँग्रेससोबत कटकारस्थान केल्याचा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.
आप हे उजवे माओवादी असून त्यांना देशातील लोकशाही पद्धतीचा नायनाट करावयाचा आहे, असेही गडकरी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केले. देशातील एका बडय़ा उद्योगपतीनेच आपल्याला एका हॉटेलमध्ये डील झाल्याची माहिती दिली, असेही गडकरी म्हणाले. माहिती देणारी व्यक्ती ही मध्यस्थाचे काम करीत होती. भाजपला सत्तेवर येऊ द्यावयाचे नाही, असे धोरण या बैठकीत ठरविण्यात आल्याचे या मध्यस्थाने सांगितले.

Story img Loader