नवी दिल्ली : लोकसभा सदस्यांचे आसन व्यवस्था व आसन क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आसनव्यवस्था दुसऱ्या ब्लॉकमधील पहिल्या रांगेत (आसन क्र. ५८) होती. मात्र आता व्यवस्था बदलण्यात आली असून गडकरींना पहिल्या ब्लॉकमध्ये चौथ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्याशेजारची जागा देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोदी सरकारमध्ये मंत्रीपद व ज्येष्ठत्वाच्या आधारे गडकरी नेहमीच लोकसभेत पहिल्या ब्लॉकच्या पहिल्या रांगेत शहांच्या शेजारी बसतात. मात्र नव्या रचनेत लोकसभाध्यक्षांनी गडकरींना दुसऱ्या ब्लॉकमध्ये आसन दिले होते व शहांच्या शेजारील ४ क्रमांकाचे आसन रिक्त ठेवले होते. हे आसन भाजपच्या नव्या पक्षाध्यक्षासाठी राखीव ठेवले जाणार असल्याची चर्चा सोमवारी रंगली.

मात्र, या रचनेमुळे गडकरींचे ज्येष्ठत्व नाकारले गेले गेल्याचे चित्र निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता असल्याने सावध होत लगेचच आसन व्यवस्था पूर्ववत करण्यात आल्याचे सांगितले जाते.

चुकून की जाणूनबुजून?

२९ नोव्हेंबर रोजी लोकसभेतील नवी आसनव्यवस्था करण्यात आली. मात्र त्यानंतर दोन दिवसांतच संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी त्यात बदल करण्यात आले व गडकरी यांना पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकाचे आसन बहाल करण्यात आले. त्यानंतर आता हा बदल चुकून झाला होता की जाणूनबुजून केला होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.