Nitin Gadkari On Live In Relationship : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. गडकरी कायमच विविध मुद्द्यांवर थेट बोलत असतात. दरम्यान आता नितीन गडकरी यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर त्यांचे मत मांडले आहे. अनफिल्टर्ड समदीश या युट्यूब चॅनलवर नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले आहे. गडकरी म्हणाले की, “लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहेत आणि यामुळे सामाजिक व्यवस्था कोसळू शकते.”

लिव्ह इन रिलेशनशिप

cag report targets nhai for 203 crore loss
CAG Report in Loksabha: महाराष्ट्रात NHAI चं २०३ कोटींचं नुकसान; CAG चा अहवाल लोकसभेत सादर, रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
ajit doval visit china
भारत – चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना, विशेष प्रतिनिधी चर्चेत दोन्ही बाजूंनी सहमती
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

या कार्यक्रमात युट्यूबर समदीशने नितीन गडकरी यांना लिव्ह इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह यावर प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, “लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे समाज व्यवस्था कोसळेल. समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. मी एकदा लंडनमधील ब्रिटीश संसदेला भेट दिली होती आणि यूकेचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना त्यांच्या देशासमोरील प्रमुख समस्यांबद्दल विचारले होते. त्यावेळी मला सांगण्यात आले की, युरोपीय देशांमधील सर्वात मोठी समस्या ही आहे की पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडत आहेत.”

हे ही वाचा : भारत – चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना, विशेष प्रतिनिधी चर्चेत दोन्ही बाजूंनी सहमती

समलैंगिक विवाह

या पॉडकास्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समलैंगिक विवाहावरही भाष्य केले. समलैंगिक विवाहाबातच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, ” समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल”.

“आदर्श भारतात घटस्फोटांवर बंदी आणावी का” असा प्रश्नही गडकरी यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, “नक्कीच नाही. पण लिव्ह-इन संबंध चांगले नाहीत”.

विशेष म्हणजे, २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. पण राज्यांना केंद्रीय कायदा नसल्यास समलैंगिक विवाह कायदेशीर करणारे कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आपल्या निर्णयात सांगितले होते.

हे ही वाचा : शहांच्या विधानामुळे विरोधकांना हत्यार, पंतप्रधानांसह भाजप नेते गृहमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात

नितीन गडकरी यांनी या मुलाखतीत गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, (RSS) बाळासाहेब ठाकरे, (Balasaheb Thackeray) मांसाहार आणि इतर मुद्दांवर विचारलेल्या प्रश्नांवरही उत्तरे दिली. गडकरींची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक युजर्स यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

Story img Loader