Nitin Gadkari On Accidents : देशात गेल्या काही वर्षात वाढलेल्या रस्ते अपघातातील मृत्युंमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच संसदेत सांगितले की, रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. तरीही लोकांमध्ये कायद्याचा आदर किंवा भीती नसल्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: रस्ता अपघाताला बळी पडले आहेत आणि या विषयाबाबतचे गांभीर्य त्यांना माहित आहे.

माझा पाय चार ठिकाणी मोडला होता

लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान रस्ते अपघातांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, “रस्ते बांधणी, ऑटोमोबाईल इंजीनियरिंग, कायद्याची अंमलबजावणी, लोकांनी कायदे पाळणे आणि लोकशिक्षण, हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी चार महत्त्वाचे घटक आहेत. पण, समाजाची सर्वात मोठी समस्या ही आहे की, लोकांना ना कायद्याचा आदर आहे, ना त्यांना त्याची भीती आहे. लोक सिग्नल पाळत नाहीत, हेल्मेट घालत नाहीत. ३० हजार लोक हेल्मेट न घातल्यामुळे मरतात अशा समस्या आहेत. मी स्वतः अपघाताचा बळी ठरलो आहे, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असताना झालेल्या अपघातात माझा पाय चार ठिकाणी मोडला होता.”

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार

रस्ते अपघातात १.६८ लाख मृत्यू

लोकसभेला रस्ते अपघातांबाबत माहिती देताना नितीन गडकरी पुढे म्हणाले, “खूप प्रयत्न करूनही यावर्षी १.६८ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, याची खंत वाटते. रस्त्यांवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यामुळे या मृत्यूंची संख्या मोठी आहे. लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे किंवा समाज यांच्या सहकार्याशिवाय अपघात कमी करणे शक्य नाही. आम्ही वाहतूक नियम न पाळणाऱ्यांसाठी दंडही वाढवला आहे पण लोक नियम पाळत नाहीत.”

हे ही वाचा :  “बाबरी मशिद प्रकरणात न्यायाची थट्टा…” मशिदी आणि दर्ग्यांविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यांवर माजी न्यायमूर्तींचे मोठे भाष्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी देशात ४.८० लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात १.७२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२२ च्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीशी तुलना केली असता, अपघातांमध्ये ४.२ टक्क्यांनी आणि मृतांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ४.६१ लाखांहून अधिक रस्ते अपघात आणि १.६८ लाखांहून अधिक मृत्यू झाले होते.

Story img Loader