पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. नरेंद्र मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी ही संधीसाधू आघाडी आकाराला येत आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते.
Union Min Nitin Gadkari at BJP National Convention in Delhi:Non-performance&corruption were the features of the previous govt. But after we came to power,good governance,ease of business&development has been delivered by Modi ji&our govt in 4.5 yrs as we promised in our manifesto pic.twitter.com/9V9v4FK7PF
— ANI (@ANI) January 12, 2019
निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये होती. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या साडेचार वर्षात सुशासन, व्यवसाय सुलभता आणि विकासाभिमुख कारभार केला असा दावा गडकरींनी केला.
राज्यसभेत व्होटबँकच्या राजकारणामुळे तिहेरी तलाकचा अध्यादेश पुन्हा आणावा लागला. राफेलवर काँग्रेसने जे आरोप केले ते फ्रान्स सरकारने फेटाळले आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली असे गडकरी म्हणाले.