महाराजगंजमध्ये संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) कोणताही संबंध नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. महाराजगंजमधील निवडणुकीसाठी एनडीएतील घटक पक्षांनी एकत्रितपणे काम केले असून, एनडीएमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होऊन परतल्यानंतर पाटण्यातील विमानतळावर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. एनडीएच्या कार्यकर्त्यांनी महाराजगंजमधील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या मतदारसंघातील संयुक्त जनता दलाचे पराभूत उमेदवार पी. के. शशी यांनी एनडीएच्या घटक पक्षांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा उत्साह नसल्याची प्रतिक्रिया बुधवारी दिली होती. निवडणुकीचे व्यवस्थापन योग्यरितीने झाले नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा