* दिल्लीच्या रामलीला मैदानावर नितीशकुमारांची “अधिकार रॅली”
बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी नितीशकुमार यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या ‘अधिकार रॅली’ला संबोधित करताना केली. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे-
* केंद्रसरकारकडून बिहार राज्याला योग्य वागणूक मिळत नाही
* बिहार राज्याला विकास करण्याचा आणि रोजगार प्राप्त करण्याचा अधिकार आहे
* रोजगारासाठी बिहार मधील जनतेला इतर राज्यात स्थलांतर का करावे लागते ?
केंद्रसरकारने बिहारसंदर्भातील आर्थिक धोरणात बदल करायला हवा. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही आमचा अधिकार मागत असून आम्हाला कुणाची भीक नको. बिहार राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असंही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा