भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या २६ विरोधी पक्षांची सोमवारी आणि मंगळवारी (१७ आणि १८ जुलै) असे सलग दोन दिवस बंगळुरू येथे बैठक पार पडली. गेल्या महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे आयोजित केलेल्या विरोधकांच्या पहिल्या बैठकीनंतर काल दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA – इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तसेच सर्व नेत्यांनी यावेळी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. परंतु या पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिसले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. नितीश कुमार यांना विरोधी आघाडीला दिलेलं I.N.D.I.A. हे नाव आवडलं नसल्याचीही चर्चा सुरू होती. त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चाही सुरू आहेत. तर विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसने हायजॅक केल्यामुळे नितीश कुमार नाराज असावेत अशा चर्चाही सुरू आहेत. या सगळ्या अफवांचं आज (१९ जुलै) नितीश कुमार यांनी खंडण केलं.

नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी बिहारच्या राजगीर शहरात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नितीश कुमार म्हणाले, ‘काल बंगळुरूत अनेक पक्षांची बैठक झाली. तिथली बैठक झाल्यावर मी लगेच निघालो. मी पत्रकार परिषदेत नव्हतो, त्यामुळे लोक वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी तिथे सगळ्यांशी चर्चा करूनच निघालो होतो. कारण मला राजगीरला पोहोचायचं होतं. मला इतकंच सांगायचं आहे की, आम्ही (विरोधी पक्ष) एकत्र आहोत.

हे ही वाचा >> VIDEO : घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या पायलट आणि तिच्या पतीला जमावाकडून चोप, गुन्हा दाखल

नितीश कुमार यांच्यासह राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादवदेखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. कारण, राजदचे प्रमुख लालू यादव तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवदेखील बैठकीनंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेले नव्हते.