घोटाळ्यांच्या गर्तेत अडकलेल्या केंद्रातील यूपीए सरकारचे नेतृत्त्व करणाऱया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाने लावून धरलीये. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या जनता दलाचे (संयुक्त) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र पंतप्रधानांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
प्रत्येक पक्षाचा कोणत्याही समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, असे मत नितीशकुमार यांनी पत्रकारांकडे व्यक्त केले. पाटण्यातील मंत्रालयात जनता दरबार झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टीकेवर त्यांनी खेद व्यक्त केला. भूतकाळातही न्यायालयाने विविध घोटाळ्यांच्या तपासावर लक्ष ठेवले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱयांमध्ये काहीही गैर नसल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा