लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार पडणार असल्याचा विश्वास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी व्यक्त केला आहे.
रामविलास पासवान म्हणाले की, “निवडणुकीच्या निकालानंतर ‘जदयु’चे अनेक आमदार नितीश कुमारांना सोडचिठ्ठी देतील. त्यामुळे नितीश कुमारांचे सरकार पडेल आणि बिहारमध्ये मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील. बिहारमध्ये भाजपबरोबर आम्ही केलेली युती यापुढेही कायम राहणार आहे आणि माझ्या यावर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवढणुका होतील. या निवडणुकीतही आम्ही एकत्र लढू आणि बिहारमध्ये सत्ता स्थापन करू.” असा विश्वासही पासवान यांनी यावेळी व्यक्त केला.
देशातील वृत्तवाहिन्यांनी ‘एक्झिट पोल’च्या माध्यमातून ‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे वर्तविल्यानंतर रामविलास पासवान यांनी देशाप्रमाणे बिहारमध्येही परिवर्तन घडून भाजप आणि लोकजनशक्ती पार्टीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
नितीश कुमारांचे सरकार पडणार- रामविलास पासवान
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार पडणार असल्याचा विश्वास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी व्यक्त केला आहे.
First published on: 15-05-2014 at 05:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar government will fall after election results says ram vilas paswan