जद(यू)चे नेते नितीशकुमार यांनी पंतप्रधान होण्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी भाजपशी फारकत घेतल्याचा आरोप भाजपने शुक्रवारी केला. इतकेच नव्हे तर जद(यू)चा ‘विजय रथ’ वर्षअखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत गडगडेल, असेही भाजपने म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमित शहा प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी नितीशकुमार यांच्यासमवेतच राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरही टीका केली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अमित शहा यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद या ठाकूर यांच्या दोघा माजी शिष्यांवरच टीका केली. काँग्रेसशी हातमिळवणी करून नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांनी ठाकूर यांच्या शिकवणीलाच तिलांजली दिली आहे, अशी टीका शहा यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in