भाजपाविरोधातील मोट बांधण्याकरता देशभरातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आज बैठक झाली. पश्चिम बंगालच्या सचिवालय कार्यालयात या तिघांनी चर्चा केली. “सर्व विरोधी पक्षयांची बैठक होण्याआधी आपण सर्व एक आहोत असा संदेश जाणं गरजेचं आहे”, असं ममता बॅनर्जी या बैठकीदरम्यान म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता बॅनर्जी यांची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “सर्व पक्षांनी एकत्र येत लोकसभा निवडणुका लढवल्या पाहिजेत. देशाच्या विकासासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एका व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. भाजपाला देशाच्या विकासाची चिंता नसून त्यांना स्वतःच्या प्रचाराची चिंता आहे.”

हेही वाचा >> महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव

“जेपी आंदोलन बिहारपासून सुरू झालं होतं. त्यामुळे सर्व पक्षीय विरोधकांची पहिली बैठक बिहारमध्ये झाली पाहिजे. या बैठकीतून एकतेचा संदेश गेला पाहिजे. या बैठकीसाठी मी नितीश कुमार यांना विनंतीही केली आहे. भाजपाचं नामोनिशाण मिटवणं आमचं उद्दीष्ट आहे. माध्यम, चुकीचे नरेटिव्ह, गुंडांचा वापर करून भाजपा हिरो बनली आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला झिरो केलं पाहिजे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच, विरोधी पक्षांच्या एकत्रित येण्यासाठी कोणाच्याही ईगोचा प्रश्न येत नाही. आम्हाला सामूहिक प्रयत्न पाहिजे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार, तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर, तमिळनाडूचे मुख्यंत्री एमके स्टालिन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar mamata banarjee tejswi yadav meet in west bengal for opposition leaders unity sgk