नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितीश यांनी इतक्या अचानकपणे निर्णय घेतल्यामुळे मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या संपूर्ण घटनाक्रमातील एक एक पैलू पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. नितीश कुमार बुधवारी राजीनामा देऊन त्यांच्या निवासस्थानी परतले तेव्हा या ठिकाणी जदयूचे अनेक आमदार जमले होते. त्यांच्याशी संवाद साधून नितीश कुमार घरात आले. तेव्हा टीव्हीवर लालू प्रसाद यादव यांची पत्रकार परिषद सुरू होती. तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश यांच्या निर्णयाचे कौतुक केले होते. नितीश यांनीही मोदींच्या या ट्विटला उत्तर दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नितीश यांना फोन केला. त्यानंतर साधारण अर्धा तासानंतर सुशील मोदी यांनी नितीश यांना फोन केला. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. ही चर्चा संपल्यानंतर नितीश यांनी बंगल्यातील आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, भाजपचे लोक येतायत, ते जेवणार पण आहेत. त्यानंतर साधारण ६० लोकांचे जेवण बनवण्यात आले. या मेजवानीसाठी पुरी, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी असा बेत आखण्यात आला होता. बंगल्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक खुर्च्याही लावण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा