भाजपशी युती करून बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात युतीतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाने आता भाजपशी भविष्यात कधीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केल़े भविष्यात काहीही परिणाम झाले तरीही भाजपशी युतीचा विषय कायमचा संपल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी सांगितल़े कोणत्याही परिस्थितीत आणि काहीही परिणाम झाले तरीही भविष्यात कधीही पुन्हा भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ भाजपचे प्रकरण कायमचे बंद झाले आहे आणि ते बरेच झाले, असे मत नितीशकुमार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात बोलतानाही व्यक्त केल़े माझे शासन राहो अथवा कोसळो, भाजपशी कधीही युती करणार नाही, असेही ते पुढे म्हणाल़े
भाजपशी युतीचा विषय कायमचा निकाली -नितीशकुमार
भाजपशी युती करून बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात युतीतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाने आता भाजपशी भविष्यात कधीही युती
First published on: 19-02-2014 at 02:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar rules out tie up with bjp in future