विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने देशातल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्काराच्या निर्णयावर भाजपा आणि एनडीएतील पक्षांनी टीका केली आहे. तसेच न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल असोसिएशनने (एनबीडीए) याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतले सदस्य असलेल्या जनता दलचे (युनायटेड) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नितीश कुमार म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही.

नितीश कुमार म्हणाले, आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही. आपल्या देशात सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पत्रकारांना वाटेल ते त्यांनी लिहावं. पत्रकार त्यांच्या मनात येईल ते लिहू शकतात. पत्रकारांना नियंत्रित केलं जातंय का? मी असं केलंय का? पत्रकारांना त्यांचे अधिकार आहेत. मी कोणाच्याही विरोधात नाही. केंद्रात आहेत त्यांनी गडबड केलीय, ते काही लोकांना नियंत्रित करत आहेत. परंतु, मी तर पत्रकारांचा आदर करतो.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
RSS Bhaiyyaji Joshi
“अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसा करावी लागते”, आरएसएस नेते भैय्याजी जोशींचं वाक्तव्य
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Nawab Malik and sameer Wankhede
Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट!
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”

बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, आमच्याबरोबर जे लोक आहेत त्यांना वाटलं असेल की माध्यमांमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे. तसं असलं तरी आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आपण सगळे स्वतंत्र आहोत, तर पत्रकारांनाही स्वातंत्र्य आहेत. त्यांनाही लिहिण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी लिहावं.

इंडिया आघाडीच्या बहिष्काराचं कारण काय?

इंडिया आघाडीतील वेगवेगळे पक्ष एकूण ११ राज्यांमध्ये सत्तेत आहेत. या सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, “आपण दररोज संध्याकाळी ५ वाजता काही वृत्तवाहिन्यांवर द्वेषाचा बाजार सुरू झालेला पाहतो. गेल्या नऊ वर्षांपासून ते सातत्याने सुरू आहे. या बाजारात वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते, नेते जातात. यात काही तज्ज्ञ, काही विश्लेषकही असतात. हे सगळे या बाजाराचा एक भाग होऊन जातात. त्यामुळे जड अंत:करणाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही या कोणत्याही वृत्तनिवेदकाला विरोध करत नाही. आम्ही त्यांचा द्वेषही करत नाही. मात्र, आम्हाला या द्वेषाचा भाग व्हायचं नाही. आम्ही आमच्या देशावर खूप प्रेम करतो. त्यामुळे हा द्वेष थांबवण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. याच कारणामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,”

Story img Loader