मंगळवारी पाटण्यात बिहार सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार इंग्रजीत बोलणाऱ्या शेतकऱ्यावर चांगलंच संतापल्याचं बघायला मिळालं. ”हे इंग्लंड नाही तर भारत आहे, हिंदीत बोला”, असं म्हणत त्यांनी भरसभेत शेतकऱ्याला सुनावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप, शास्त्रज्ञांनी दिला इशारा; म्हणाले, “पृथ्वीच्या…”

बिहार सरकार लवकरच राज्यात कृषी रोड मॅप लागू करणार आहे. त्यापूर्वी यासंदर्भात शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी बिहार सरकारच्यावतीने मंगळवारी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक विभागांचे मंत्री, अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी शेतकरी आपलं म्हणणं मांडत असताना एका शेतकऱ्याने भाषणात इंग्रजी शब्दांचा वापर केला. त्यामुळे नितीशकुमार शेतकऱ्यावर संतापले. ”तुम्ही इंग्रजीत का बोलत आहात? हे इंग्लंड नाही, तर भारत आहे, तुम्ही हिंदीत बोलायला पाहिजे. इथे आलेले शेतकरी सामान्य कुटुंबातील आहे, त्यांना इंग्रजी कसं समजणार?” असं म्हणत त्यांनी भरसभेत शेतकऱ्याला सुनावलं. ”कोरोना आल्यापासून लोक आपली मातृभाषा आणि राज्यभाषा विसरत आहेत. प्रत्येकजण इंग्रजीचा वापर करतो आहे. जिथे इंग्रजीची गरज आहे तिथे त्याचा वापर व्हायला हवा. मात्र, इथे शेतीची चर्चा इंग्रजीत नाही तर आपल्या मातृभाषेत व्हायला हवी”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar slams farmer for speaks in english at patana farmer meet program spb
Show comments