बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग माध्यमाचा आधार घेत अप्रत्यक्षपणे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राजकीय नेत्यांकडून दररोज ट्विटरवरून करण्यात येणारी टिव-टिव ही आता कर्णकर्कश झाली आहे.
नितीशकुमार ‘जनता के दरबार में मुख्यमंत्री’ या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, “इंग्रजी शब्दकोशात ट्विटरचा अर्थ पक्ष्यांचा चीवचीवाट असा होतो. पण, आता दररोज सकाळी काही नेते गरजेपेक्षा जास्त ट्विट करत असतात. त्यामुळे आता ही टिवटिव कर्णकर्कश वाटू लागली आहे. माझ्या मते, आता माध्यमांजवळ आपले म्हणणे पोहचविण्याशिवाय दुसरे काही काम या नेत्यांना राहीलेले नाही. असे नेते ट्विटरवरही आपला एकधिकार बनविण्याचा प्रयत्न करत असतात”
‘सोशल नेटवर्किंगवर राजकारण्यांचा टिवटिवाट वाढलाय’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग माध्यमाचा आधार घेत अप्रत्यक्षपणे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी
First published on: 03-09-2013 at 11:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar takes a dig at politicians who indulge in excessive tweeting