‘जेडीयू’ ने भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आज  घेतला. ‘एनडीए’मधून ‘जेडीयू’ बाहेर पडल्याचे ‘जेडीयू’ अध्यक्ष शरद यादव यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत घोषित केले. गेल्या सतरा वर्षांपासून असेलेल्या या युतीला मोदींची निवडणुक प्रचार प्रमुखपदी निवड झाल्याने विरजण लागले. तसेच, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

“भाजपच्या नव्या भूमिकांशी आम्ही सहमत नाही, अडवाणी व वाजपेयी यांच्याशी १७ वर्षांपूर्वी आम्ही आघाडी केली होती. बिहारमध्ये, भाजपने वेगळी भूमिका घेण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात  आले आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष सत्र बोलावण्यात यावे अशी राज्यपालांकडे मागणी केली आहे,”  असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यांनी आज कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीवर  भाजपच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदींसह भाजपचे इतर मंत्री या बैठकी पासून लांब राहीले. राज्याच्या मंत्रीमंडळातील एकूण २९ मंत्र्यांपैकी भाजपचे ११ मंत्री आहेत.

Story img Loader