भाजपशी असलेली युती तोडल्यामुळे अल्पमतात आलेल्या नितीशकुमार यांच्या सरकारने बुधवारी विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठराव अपेक्षेप्रमाणे जिंकला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेडीयूला अपक्षांसह सभागृहातील १२६ सदस्यांनी पाठिंबा दर्शवला तर २४ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. दरम्यान, भाजपने नितीशकुमार यांचा निषेध करीत विश्वासघाताचा आरोप करीत सभात्याग केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख नेमल्यामुळे अस्वस्थ झालेल्या जेडीयूने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात सरकारमध्ये असलेल्या भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे नितीशकुमार सरकार अल्पमतात आले होते. याप्रकरणी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी नितीशकुमार यांना विश्वासदर्शक ठराव आणण्याची सूचना केली होती. मात्र बहुमताचा विश्वास असल्यामुळे नितीशकुमार यांनी राज्यपालांच्या सूचनेनुसार बुधवारी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.
विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान, भाजपने नितीशकुमार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. तसेच नितीशकुमार विरोधात तर नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देत भाजपच्या ९१ आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेस ४,भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे नितीशकुमार सरकारपुढील मार्ग मोकळा झाला. पाठींबा देणाऱ्या या आमदारांमुळे जेडीयूला १२६ चा आकडा गाठता आला.
नितीशकुमार सरकार तरले
भाजपशी असलेली युती तोडल्यामुळे अल्पमतात आलेल्या नितीशकुमार यांच्या सरकारने बुधवारी विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठराव अपेक्षेप्रमाणे जिंकला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेडीयूला अपक्षांसह सभागृहातील १२६ सदस्यांनी पाठिंबा दर्शवला तर २४ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar wins confidence vote in bihar assembly