रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय. त्यापैकी काही मायदेशी परतले असून काहींना लवकरच आणलं जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी हे युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महत्वाची घोषणा केली आहे.
Video: युद्धाविरोधात ना’राजीनामा’… एकाच वेळी Live Telecast दरम्यान सर्वांनी सोडली नोकरी
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून परदेशी वैद्यकीय पदवीधरांना करोना विषाणू तसेच युक्रेनमधील युद्ध यांसारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप देशात पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. आयोगाने सांगितले की, जर उमेदवारांनी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (FMGE) उत्तीर्ण केली असेल तर इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अर्जावर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते.
“करोना विषाणू आणि युद्ध अशा परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप असलेले काही परदेशी वैद्यकीय पदवीधर देखील आहेत. या परदेशी वैद्यकीय पदवीधरांना होणारा त्रास आणि तणाव लक्षात घेऊन, त्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येईल,” असे आयोगाने म्हटले आहे.
Ukraine War: “आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी
इंटर्नशिप पूर्ण करण्याची परवानगी युक्रेनमधील विविध वैद्यकीय महाविद्यालयातील भारतीय विद्यार्थ्यांना मदत करू शकते, ज्यांना रशियन आक्रमणामुळे आपले अभ्यासक्रम सोडावे लागले. आयोगाच्या या निर्णयामुळे शेकडो भारतीय विद्यार्थांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.