अमेरिकेच्या प्रवेशपत्र (व्हिसा) धोरणात काहीही बदल करण्यात आलेला नसून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्याचा कुठलाही विचार नाही, आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी तो मुद्दा बाजूला ठेवून आम्ही भारताबरोबरच्या भागीदारीच्या संबंधांचा विचार करीत आहोत असे ओबामा प्रशासनाने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशिया विभागाच्या सहायक परराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल यांनी सांगितले की, सध्यातरी अमेरिकेच्या प्रवेशपत्र धोरणात काही बदल झालेले नाहीत, जे कुणी अर्ज करतील त्यांना विशिष्ट प्रक्रियेतून जावेच लागेल.

Story img Loader