आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी केलेली निवड कोणत्याही स्थिती मागे घेणार नसल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मोदी यांची निवड झाल्यानंतर लगेचच लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपमधील तीन पदांचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी आपण कोणताही निर्णय मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे.

Story img Loader