जम्मू आणि काश्मीरमधून  लष्कराला असलेला विशेषाधिकार हटविण्याबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आपण यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमासाठी राहुल गांधी येथे आले असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांतून लष्कराला असलेला विशेषाधिकार रद्द करावा अशी मागणी अनेक दिवस ओमर अब्दुल्ला करत आहेत. मात्र लष्कराने हा रद्द करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

Story img Loader