धार्मिक स्थळ अपवित्र करण्याच्या कथित कृतीच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने होऊन गुरुवारी १० पोलिसांसह १४ जण जखमी झालेल्या जम्मू- काश्मीरच्या सांबा जिल्ह्य़ातील संचारबंदी उठवण्यात आली आहे.
शनिवारी जिल्ह्य़ाच्या कोणत्याही भागात काही अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे सांबा जिल्ह्य़ातील संचारबंदी उठवण्यात आली असली, तरी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ अद्याप लागू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सांबा जिल्ह्याचे उपायुक्त शीतल नंदा यांनी शुक्रवारी येथील खेडय़ांच्या प्रमुखांची, तसेच जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांना शांतता आणि सद्भावना टिकवण्याचे आवाहन केले. दगडफेकीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर लष्कराने काल ध्वजसंचलन केले. येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा