दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकास विरोध करणारा एआयएमआयएम पक्ष समाजात द्वेष निर्माण करीत असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना व एआयएमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते परस्परविरोधी भूमीका ठरवून घेत आहेत. आज ना उद्या हे जनतेसमोर येईल, असे मुंडे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक नियोजित स्थळी उभारलेच गेले पाहिजे, अशी भूमीका मुंडे यांनी घेतली. या स्मारकाऐवजी रूग्णालय उभारण्याची मागणी एआयएमआयएमने केली होती. त्यावर ठाकरे व मुंडे यांनी आयुष्यभर दिनदुबळ्यांची, महाराष्ट्राची सेवा केली. त्यामुळे त्यांचे स्मारक व्हावे, असे मुंडे यांनी सांगितले. एआयएमआयएम दोन समुदायात तेढ निर्माण करीत आहे. या पक्षास राज्यघटना मान्य नाही. एआयएमआयएमने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास विरोध केला आहे. सरकारी पैशाने स्मारके उभारली जावू नये, अशी भूमीका एआयएमआयएमने घेतली आहे. त्यावर शिवसेनेने ‘दै. सामना’च्या अग्रलेखातून एआयएमआयएमवर हल्ला चढविला. आधी बेकायदेशीर मशिदी पाडा , वंदे मातरम म्हणा मग उपदेशाची ‘बांग’ द्या असा टोला सेनेने लगावला. महाराष्ट्रात हजारे मशिदी व दर्गे सरकारी जमिनींवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.
एआयएमआयएम, शिवसेना सारखेच – धनंजय मुंडे
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकास विरोध करणारा एआयएमआयएम पक्ष समाजात द्वेष निर्माण करीत असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
First published on: 09-06-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No difference in shiv sena mim dhananjay munde