करविवरणाची माहिती ‘ऑनलाइन’ पद्धतीने मिळविली जात असून, त्यामधूनच करचुकवेगिरी करणाऱ्यांची लबाडी उघड होत आहे. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी येथे दिला. ‘आयकर चुकविणाऱ्यांची आता कदापिही गय केली जाणार नाही,’ असे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले. ‘ऑनलाइन’ माध्यमातून करदात्यांची आता आमच्याकडे मोठी माहिती संकलित झाली असून त्याद्वारेच करचुकवेगिरी करणाऱ्यांची माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आता अशा लोकांना माफी नाही, असे अर्थमंत्री म्हणाले.
महिला बँकेच्या सहा शाखा महिलांसाठी स्थापन करण्यात येणारी ‘महिला बँक’ येत्या नोव्हेंबरपासून कार्यान्वित होईल आणि प्रारंभी देशभरात या बँकेच्या सहा शाखा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.