नेस्ले इंडिया कंपनीच्या बंदी घालण्यात आलेल्या मॅगी नूडल्स खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा गोवा आणि म्हैसूर येथील प्रयोगशाळांनी दिलेला नाही, असे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) संस्थेने बुधवारी स्पष्ट केले. मॅगी नूडल्सच्या चाचणीत काही त्रुटी असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
गोव्यातील अन्न आणि औषधे प्रयोगशाळा आणि म्हैसूरच्या सीएफटीआरआय संस्थेने दिलेला अहवाल एफएसएसएआयने फेटाळला आहे. ब्रिटन आणि सिंगापूरने मॅगी खाण्यायोग्य असल्याच्या दिलेल्या निर्वाळ्याबद्दल संस्थेने संशय व्यक्त केला आहे. कारण परदेशात करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल कंपनीने उपलब्ध करून दिलेला नाही. गोव्यातील प्रयोगशाळेच्या चाचण्या फेटाळताना एफएसएसएआयने म्हटले आहे की, शिशाचे मान्यताप्राप्त प्रमाण २.५ इतके असताना प्रयोगशाळेतील अन्न विश्लेषकाने शिशाचे मान्यताप्राप्त प्रमाण प्रतिदशलक्ष १० असे गृहीत धरले होते. तर म्हैसूरच्या संस्थेने नूडल्सची बंदी घालण्यात आलेल्या एमएसजीची चाचणी केली नाही.
त्यामुळे एफएसएसएआय संस्थेने मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिलेला नाही, असे संस्थेने प्रथम स्पष्ट केले आहे. मॅगीचे नमुने सुरक्षित असल्याचा निर्वाळा गोवा आणि म्हैसूर येथून आला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा