विहिंपची माहिती
राम मंदिर उभारणीबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे विश्व हिंदू परिषदेने मान्य केले आहे. संसदेत कायदा करूनच अयोध्येत मंदिर उभारणी व्हावी या मतावर विहिंप ठाम असल्याचे विहिंपचे नेते चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे.
मंदिर उभारणीबाबत अयोध्येत घडामोडी सुरू असल्याबाबत माध्यमांच्या वृत्ताबाबत ही नेहमीच घडामोड असल्याचे सांगत, या प्रकरणी न्यायालयीन निर्णयाचा आदर केला जाईल, असे राय यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी एक निवेदन दिले आहे. संत किंवा विश्व हिंदू परिषदेने मंदिर उभारणीबाबत संसदेने कायदा करावा, हीच नेहमी भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. याबाबत स्वामी नृत्यगोपाल दास यांचे विधान दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in