तब्बल ३६ वर्षांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरले. लुसेल स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पराभूत केलं होतं. या कामगिरीसाठी कर्णधार लिओनेल मेस्सीने महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यातच काँग्रेस खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केला आहे.
फुटबॉल स्पर्धेतील विजयानंतर आसाममधील काँग्रेसचे खासदार अब्दुल खलीक यांनी ट्वीट करत मेस्सीला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, तुझ्या आसाम संबंधाचा आम्हाला अभिमान आहे, असं खलीक म्हणाले होतं. तर, मेस्सीचं आसामशी संबंध काय? असा प्रश्न एकाने ट्वीटरवर खलीक यांना विचारला. त्याला उत्तर देताना मस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा खलीक यांनी केला होता. खलीक यांच्या वक्तव्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
खलीक यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रीय लोक दलाचे ( आरएलडी ) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी एक विधान केलं आहे. ट्वीट करत जयंत चौधरी म्हणाले, “नाही मेस्सीचा जन्म उत्तरप्रदेशात झाला नाही. पण, यावरून उत्तरप्रदेश गोंधळ सुरु आहे,” असा खोचक टोला जयंत चौधरी यांनी योगी सरकारला लगावला आहे.
हेही वाचा : “भारतातलं वास्तव म्हणजे घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार आणि…”, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं परखड भाष्य!
ट्रोल झाल्यावर खलीक यांचं ट्वीट डिलीट
मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेसचे खासदार खलीक मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. कोणी म्हटलं मेस्सी माझा वर्गमित्र आहे, तर कोण म्हणाले तो माझा नातेवाईक आहे. यानंतर खलीक यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. पण, त्यांच्या ट्वीटचं स्क्रिनशॉट समाज माध्यमांवर व्हायरल झाले होतं.