भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी आज सांगितले. एका खासगी कार्यक्रमात मुलायमसिंग म्हणाले, की मोदींचा उत्तर प्रदेशात काहीही परिणाम होणार नाही. केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी असा दावा केला आहे, की काँग्रेस राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकेल. त्याला उत्तर देताना मुलायमसिंग म्हणाले, की वर्मा यांनी अगोदर त्यांच्या मतदारसंघात जिंकून दाखवावे, नंतर बोलावे. मुलायमसिंग हे नंतर कार्यक्रमासाठी इटवाह येथे गेले.

Story img Loader