केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. शुक्रवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“यासंदर्भातील ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शुक्रवारपासून सुरू झाली असून शेड्युल आज ८ जानेवारी रोजी प्रकाशित केले जाणार आहे. ऑनसाइट अपॉइंटमेंटसह लसीकरण १० जानेवारीपासून सुरू होईल,” असे एएनआय या वृत्तसंस्थेने मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत सांगितले आहे.

Corona Update : देशात करोनाची तिसरी लाट धोकादायक; गेल्या २४ तासांत १ लाख ४० हजार नवे रुग्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी ओमायक्रॉन प्रकाराच्या प्रसारादरम्यान लसीचा बूस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घोषणा केली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर, ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा, असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे.

करोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम…

देशात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. 

 शुक्रवारी रात्री उशिरा, १,४१,५२५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. याआधी शुक्रवारी १ लाख १७ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात २८ डिसेंबरपासून प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या ११ दिवसांत दररोज २० टक्के अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर यातील ४ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची वाढ ४० टक्क्यांहून अधिक आहे.देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ५२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५  लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात करोनाच्या ओमायक्रॉन बाधितांची ३०७१ प्रकरणे समोर आली आहेत.