Corona Outbreak in China And Situation in India: चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा करोना संसर्गासंदर्भातील दहशत भारताही निर्माण झाली आहे. मात्र भारत सरकारला करोनासंदर्भातील सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख असलेल्या डॉक्टर एन के अरोरा यांनी चीनमधील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतीयांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

नव्या व्हेरिएंटची चिंता करावी का?

नवीन व्हेरिएंटची भिती निर्माण झाली आहे का? आपल्याला काही चिंता करण्याची गरज आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अरोरा यांच्याशी चर्चा करताना विचारला. त्यावर अरोरा यांनी, “आपण चिंता करण्याची गरज नाही. गोष्टी अगदी सुस्थितीत आहेत. आपल्या देशातील लोकांना लसीकरणाच्या माध्यमातून सुरक्षित करण्यात आलेलं आहे,” असं उत्तर दिलं. तसेच,आपल्यापैकी अनेकांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नैसर्गिकपणे या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असल्याने आपल्यातील हायब्रिट इम्युनिटी (नैसर्गिकरित्या निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती) उत्तम आहे. ओमिक्रॉनचा आपण यशस्वीपणे सामना केला आहे. आपल्याकडे त्यावेळेस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही,” अशी आठवणही अरोरा यांनी करुन दिली.

Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

भारतीयांना संसर्गाचा त्रास नाही

“मार्च-एप्रिलमध्ये आपल्याकडे रुग्णसंख्या वाढली होती. मात्र आता आपल्याकडे रुग्णसंख्या २०२० नंतर सर्वात कमी स्तरावर आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जिनोम सिक्वेन्सिंगचा आहे. २०२२ च्या शेवटापर्यंत याकडेच लक्ष देण्यात आलं आहे. जगभरामध्ये ज्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत ते आपल्याकडेही आढळून आले आहेत. मात्र भारतीयांना या संसर्गाचा फार त्रास झाला किंवा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं दिसून आलं नाही,” असं निरिक्षण अरोरा यांनी नोंदवलं.

नक्की वाचा >> Bharat Jodo Yatra: “…नाहीतर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करा”; ‘राष्ट्रहिता’चा उल्लेख करत मोदी सरकारचं राहुल गांधींना पत्र

सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहेत

“आपण याच मार्गाने वाटचाल करणं आवश्यक आहे. मात्र जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात अधिक सतर्क होऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे एखादा वेगाने पसरणारा आणि जास्त घातक नवीन व्हेरिएंट आला तर त्याची माहिती लवकर मिळू शकते. सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही,” असं अरोरा म्हणाले.

नक्की पाहा >> करोनाच्या ज्या व्हेरिएंटने माजवला चीनमध्ये कहर त्याच व्हेरिएंटचा पहिला रूग्ण गुजरातमध्ये

मोठा गोंधळ निर्माण झाला नाही

केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का? असा प्रश्न अरोरा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “नाही असं काही नाही. मी या जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात निर्णय घेणाऱ्या गटाच्या संपर्कात आहे. नव्या व्हेरिएंटमुळे मागील वर्षाप्रमाणे मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र आता आपली जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भातील यंत्रणा फारच सतर्क, सक्रीय असणं गरजेचं आहे,” असं सांगितलं.

नक्की पाहा >> जमीनीवरच व्हेंटिलेटर, CPR उपचार, रुग्णांना तपासता तपासता झोपी जाणारे डॉक्टर अन्…; चीनमधील करोनाची दाहकता दर्शवणारे Videos

उद्या महत्त्वाची बैठक

तसेच, “आपण डॅशबोर्ड तयार केला असून त्यावर दर आठवड्याची आकडेवारी पाहता येते. बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा भारतात प्रसार झाला नाही. जास्तीत जास्त रुग्ण हे बीएक्सएस आणि बी-२७५ या व्हेरिएंटचे जास्त रुग्ण या घडीला भारतात आहेत. मला सांगायचं असं आहे यंत्रणा कार्यरत आहेत. बऱ्याच गोष्टी आपण आधीच केलेल्या आहेत. उद्या आमची बैठक आहे. त्यात काय होईल हे समोर येईलच,” असं अरोरा यांनी सांगितलं.