केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी अजूनही गूढ उकलले नसून यापुढेही तपास चालू राहील, परिस्थितीजन्य पुरावे पाहता भा.दं.वि कलम १७४ अन्वये तपास करण्यात आहे. नव्याने एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात येणार नाही जर त्यांच्या मृत्यूत काही गैरप्रकाराचा भाग दिसून आला तरच नव्याने एफआयआर दाखल केला जाईल तोपर्यंत कलम १७४ अन्वयेच तपास चालू राहील, असे असे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले.
ते म्हणाले, की सेंट्रल फोरेन्सिक लॅबोरेटरीच्या अहवालातून तपासात प्रगती होईल असे काही निष्पन्न झालेले नाही. आता त्यांचा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील ज्या डॉक्टरांनी सुनंदा यांचे शवविच्छेदन केले होते त्यांच्याकडे पाठवला जाईल, या अहवालात विषबाधेची शक्यता फेटाळण्यात आली आहे.
मध्यंतरी जो संशयास्पद मृत्यू झाला त्यातील व्हिसेरा अहवाल मिळाला असून त्यात विषाचा कुठलाही अंश सापडलेला नाही; त्यामुळे गेल्या १७ जानेवारीला सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक झालेला मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कोडे आणखी कठीण बनले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदा यांच्या व्हिसेराची जी तपासणी करण्यात आली त्यात नराश्यावर वापरल्या जाणाऱ्या अल्प्रॅक्स या औषधाचा अंश सापडला नाही. त्यांचा मृत्यू विषबाधेने झाला व त्यात अल्प्रॅक्सच्या गोळ्या हे एक कारण असावे असा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालात काढण्यात आला होता, त्याच्या एकदम उलटा निष्कर्ष हा व्हिसेरा अहवालात निघाला आहे. चौकशीकर्त्यांना त्यांच्या मृतदेहाजवळ अल्प्रॅक्स या औषधाच्या रिकाम्या पट्टय़ा सापडल्या होत्या. व्हिसेरा अहवालात मात्र सुनंदा यांनी त्या गोळ्या योग्य प्रकारे घेतल्या होत्या किंवा दुसरे कुणीतरी खोलीत आले व औषधाच्या रिकाम्या पट्टय़ा तिथे ठेवून गेले. तेथे अल्प्रॅक्सच्या दोन पट्टय़ा सापडल्या होत्य व एका पट्टीत किमान १५ गोळ्या असतात. एक पट्टी रिकामी होती व दुसरीत तीन गोळ्या शिल्लक होत्या. त्यामुळे त्यांनी जास्त गोळ्या घेतल्याचा निष्कर्ष चौकशीकर्त्यांनी काढला होता. पण आता त्यांनी जर योग्य प्रमाणात गोळ्या घेतल्या होत्या तर रिकाम्या पट्टय़ा तेथे कुठून आल्याच याचा शोध घ्यावा लागेल असे तपासकर्त्यांनी म्हटले आहे.
शशी थरूर यांचे कथित पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी संबंध असल्याचे ट्विटरवरून कळल्यानंतर त्या आणखी संतापल्या होत्या व नराश्यातही गेल्या होत्य़ा. शवविच्छेदन अहवालानुसार सुनंदा यांचा मृत्यू अचानक व अनसíगक पद्धतीने झाला. आता व्हिसेरा अहवाल शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांपुढे मांडला जाणार आहे. त्यांच्या मृतदेहावर ज्या जखमांच्या खुणा होत्या त्या दिशेने आता तपास करावा लागेल,असे सांगण्यात आले.