आपल्या देशात कोणत्याही प्रकारच्या जातीयवादाला थारा नाही, असे स्पष्ट करीत देशातील मोठय़ा संख्येने असलेल्या बौद्ध धर्मीयांनी इतर धर्मीयांच्या अधिकारांचे संरक्षण करावे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे राष्ट्रपती  महिंदा राजपक्षे यांनी केले.
श्रीलंका हा लोकशाही मानणारा देश आहे. बिगर बौद्ध धर्मीयांनाही देशात समान हक्क आणि स्वातंत्र्य आहे. देशात बौद्ध धर्मीयांची संख्या मोठी असली तरी त्यांनीही इतर धर्मीयांच्या अधिकारांचे संरक्षण करावे, असे आवाहन राजेपक्षे यांनी केले.
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे देशविरोधी चुकीचा संदेश पसरवणारी युद्ध सामग्रीच आहे. अशा परिस्थितीत मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्वानीच देशात वांशिक आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही राजेपक्षे म्हणाले. मुस्लीम समुदायांच्या उद्योगधंद्यांवर नुकतेच हल्ले झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रपती राजेपक्षे यांनी देशात जातीयवादाला थारा नसल्याचे प्रतिपादन केले.
बोडू बाला सेना या राष्ट्रीय पातळीवर सक्रिय असणाऱ्या बौद्ध धर्मीय गटाने देशातील वाढत्या मुस्लिमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीलंकेच्या १० टक्के म्हणजे २० दशलक्ष मुस्लीम लोकसंख्या आहे. देशात मोठय़ा प्रमाणात सिंहली बौद्ध धर्मीय असून बहुसंख्य तामिळी हे हिंदू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा