नवी दिल्ली :अमेरिकेसह ‘ड्रोन’ खरेदी कराराबाबत किंमतीसह संपादन प्रक्रियेबाबत समाज माध्यमांवर प्रसृत होणाऱ्या वृत्तांना संरक्षण मंत्रालयाने फेटाळले आहे. भारताने अमेरिकेकडून ‘३१ एमक्यू-९ बी ड्रोन’ कराराबाबत खरेदी दर आणि इतर अटी-शर्ती अद्याप निश्चित झालेल्या नाहीत, असा खुलासाही मंत्रालयाने केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रालयाने स्पष्ट केले, की या ‘ड्रोन’ची उत्पादक कंपनी जनरल अ‍ॅटॉमिक्स (जीए) द्वारे इतर देशांना हे ड्रोन विकताना ठरलेल्या दराशी भारताच्या करारातील दराशी तुलना केली जाईल. त्यानंतर खरेदी योग्य प्रक्रियेनुसार केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिकेने ‘ड्रोन’ खरेदी कराराला मंजुरी दिली होती.

संरक्षण मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘ड्रोन करारा’संदर्भात खरेदी दर आणि करारातील इतर अटी-शर्तीबाबत समाजमाध्यमांवर प्रसृत झालेली माहिती ही केवळ अफवा आहे. ठोस माहितीविनाच व्यक्त केलेले अंदाज आहेत. विशिष्ट हेतूने याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. यामागे स्वार्थी हेतू असून, या खरेदी प्रक्रियेत अडथळा आणण्याचा हेतू त्यामागे आहे. या ‘ड्रोन’चे खरेदी दर आणि इतर अटी अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. या संदर्भात वाटाघाटी चालू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No price fixing in drone deal with us says defense ministry zws