कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणावरून कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावली. खाणवाटप गैरव्यवहार प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावरून अश्विनीकुमार यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालात काही दुरूस्त्या आणि फेरफार झाल्याचे सर्वोच्च न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाने(सीबीआय) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध झाले आहे. सीबीआयच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांची ही मागणी पंतप्रधांनी फेटाळून लावली आहे. अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी बद्दल पत्रकारांनी मनमोहन सिंग यांना विचारले असता, “गेल्या नऊ वर्षातली ही काही पहीली गोष्ट नाही, प्रत्येकवेळेस राजीनाम्याची मागणी होत असते. त्यामुळे विरोधकांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालु द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
अश्विनीकुमारांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचे वक्तव्य
कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणावरून कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावली. खाणवाटप गैरव्यवहार प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावरून अश्विनीकुमार यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
First published on: 27-04-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No question of law minister ashwani kumar resigning pm