१६ डिसेंबर रोजी राजधानीत झालेल्या बलात्कार व खुनाच्या घटनेनंतरही दिल्लीत अशा घटना थांबल्या नसून अद्यापही महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रकारांना तातडीने आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्याची गरज प्रतिपादित केली आहे. दिल्ली शहर आणि परिसरात १६ डिसेंबरच्या घटनांनंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे या शहरातील खास करून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असे के. एस. राधाकृष्णन आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांने यासंबंधात एक जनहितार्थ याचिका दाखल केली असून बलात्कारित पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी मंडळ स्थापन करण्याबाबत आदेश द्यावेत, असे आर्जव केले आहे.
राजधानीतील सुरक्षेची न्यायालयाकडून दखल
१६ डिसेंबर रोजी राजधानीत झालेल्या बलात्कार व खुनाच्या घटनेनंतरही दिल्लीत अशा घटना थांबल्या नसून अद्यापही महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रकारांना तातडीने आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्याची गरज प्रतिपादित केली आहे.
First published on: 12-01-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No safety in capital it must be restored sc