‘किंगफिशर’ या विमान कंपनीचे मालक व यूबी समूहाचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी मंगळवारी त्यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त तीन किलो वजनाच्या सोन्याच्या विटा येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वराला अर्पण केल्या. मल्ल्या यांनी मनोभावे पूजाअर्चा करून नंतर हे सोने अर्पण केले. गाभाऱ्यातील दरवाजांसाठी हे सोने वापरावे असे त्यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
तिरुमला तिरुपती देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी चिन्नमगिरी रामण्णा यांनी सांगितले, की मल्ल्या हे काल रात्री सहकुटुंब येथे आले व तिरुमला तिरुपती देवस्थानात एका साध्या समारंभाने वाढदिवस साजरा केला. तेथील व्यंकट विजयम हे अतिथिगृह पंधरा वर्षांपूर्वी मल्ल्या यांच्या देणगीतून उभारण्यात आले आहे, तेथेच ते आता वास्तव्यास होते.
ऑगस्टमध्ये मल्ल्या यांनी कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हय़ात असलेल्या कुके सुब्रमण्या मंदिरात ८० लाख रुपयांचे सोन्याचे दरवाजे अर्पण केले होते. नशीब बदलण्यासाठी अनेक नामवंत लोक या मंदिरात येत असतात.
तिरुपती प्रेम
दरम्यान, मल्ल्या यांची किंगफिशर ही २००५ मध्ये स्थापन केलेली विमान कंपनी सध्या आर्थिक पेचप्रसंगात असून, त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. मल्ल्या यांनी खरेदी केलेले प्रत्येक विमान पहिल्यांदा तिरुपतीला जात असे व व्यंकटेश्वरा मंदिराला वरून फेऱ्या मारून नंतरच सेवा सुरू करीत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा